दोष काढणारे रामातही दोष काढतात तर गुण शोधणारे रावणातही चांगल शोधतात…समाज हा असा आहे तो त्याच्या सोयीने आपल्याबद्दल मत बनवत असतो…आपल्या आयुष्याशी ,परिस्थितीशी त्याला देण घेणं नसतं त्यांना फक्त त्यांच्या सोयीने आपल्याला लेबल लावायचं असतं….
स्वतःला एका ठराविक साच्यात बांधून घेऊन जगणं विसरू नका
तुम्हाला देवाने अमर्यादित अश्या संधी दिल्यात
त्या संधीचा लाभ घ्या…
तुमची प्रगती रोखणारे तुम्ही स्वतः आहात
आधी स्वतःशी मैत्री करा आर्धी लढाई तुमची स्वतःशीच आहे त्यात यश मिळवा.
#Pranjal_
प्रांजल
शाळेत असताना भावाची जुनी पुस्तक वापरायचा प्रवास आज त्याचा जुना मोबाईल वापरण्यापर्यंत येऊन पोचलाय…
घरात सगळ्यात छोट्याचे हे असे लाड होतात मद्यमवर्गी कुटुंबात..
कधीकधी माणूस आपली दुःख लपवून आभासी जगात वावरत असतो... खरतर त्याला ती लपवायची नसतात पण लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा त्याला नको असतात....
#Pranjal_
प्रांजल
एखाद्याच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख झाली नसताना केवळ वरवरच्या वागण्याने त्याच्याबद्दल मत बनवू नका...जर मत बनवलच तर त्या मताला मनात सारखं घोळून त्या व्यक्तीविषयी मनभेद करून घेऊ नका..मतभेद जर मनभेद करत असतील तर तुमचं मन कदाचित तुमचं व्यक्तिमत्त्व चुकीच्या दिशेने घडवत आहे जे घातक आहे
ह्या आभासी जगात कधीकधी काही अशी माणस भेटतात जी आपल्याकडून चुका होऊ नये म्हणून आपल्याला मोठ्या बहीण /भावाच्या हक्काने समजून सांगतात..
पुसटशी ओळख देखील नसताना ती काळजी करतात ,आपल्याला जपतात ..जगात माणुसकी शिल्लक आहे ती या लोकांमुळे ते जेवढं शक्य आहे तेवढी दुसऱ्यांची मदत करतात.
जन्मताच कोणीही परिपूर्ण नसतं…काहीना काही कमी असतेच..त्यात सुधारणा करत पुढे जात राहायच असत..देव कधीही तुम्हाला एका साच्यात बंदिस्थ करुन ठेवत नाही त्याने तुमच्या प्रगतीवर कुठलीच मर्यादा घातली नाहीये…तुम्हाला अमर्यादित अश्या संधी आहेत…स्वतःतल्या कमतरता ओळखून त्यात सुधारणा करत रहा
मनाच्या तळाशी साचलेल भावनारुपी द्रव्य बाहेर काढायची संधी नियती काहींना देत नाही. आपल्या मनातलं ते कडवट द्र्व्य आपल आपणच पचवायचं असतं कोणालाही खबर न लागता.
#Pranjal_
प्रांजल
जो क्षण हातात आहे तोच आपला आहे
बाकी येणाऱ्या क्षणांवर आपला काहीच अधिकार नाही हे पटत जात .
मी हे ठरवलेलं ,अस करायचं होत ,ह्या अश्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही
उद्यावर ढकललेले कधीच अनुभवता येत नाही .
#Pranjal_
प्रांजल
काही वेळेस समस्येकडे आपण इतके लक्ष देतो की solution सापडत नाही..आणि काही वेळेस आपण सोल्यूशन शोधायची इतकी घाई करतो की आपण प्रॉब्लेम नीट समजून घेत नाही…म्हणून मन शांत ठेवून विचार करावा म्हणजे परिस्थिती नियंत्रणात लवकर येते…
#Pranjal_
प्रांजल ✍️
बहिणीच्या शाळेत सर्व मुलांना बाप्पाची मूर्ती रंगवायचा उपक्रम दिलेला…शाळेने दिलेली सर्वांना same बाप्पाची मूर्ती 😍
गणपती बाप्पा मोरया 🙏
मंगलमूर्ती मोरया 🙏
#Latepost
आठवणी येतात डोळ्याच्या कडा पाणावून जातात,
आत दडवलेली ती कुपी उफाळून वर आणतात..
अजूनही ताजी आहेत ती फूल असा भास देऊन जातात,
सोबतच्या त्या गोड क्षणांचा सुगंध देऊन जातात..
पुन्हा ती बाग फुलेल अशी आस मनी लावून जातात,
आठवणी येतात डोळ्याचा कडा पाणावून जातात…
#Pranjal_
प्रांजल
फॉलोबॅक द्यायला लिमिट आहे.
हळू हळू सर्वांना फॉलोबॅक देण्यात येईल तोवर दम धरावा…
कृपया फॉलोबॅक दिल्यावरच unfollow करावे त्याआधी करून मनाला वेदना देऊ नये
कळावे🙏
मनुष्य स्वभाव असा आहे की तो दुसऱ्याबद्दल मत खूप लवकर बनवतो.आणि ते पटकन बनवलेलं मत दीर्घकाळ टिकवतो…चुकीच मत पुसायला कस लागतो सहजासहजी मनुष्य आपण बनवलेल्या मतात बदल करत नाही.
थोडं थांब,शांत हो,मग बघ,मार्ग आपोआप दिसेल.
स्वतःच्या ध्येयांवर,स्वप्नांवर विश्वास ठेव,कारण ही लढाई तुझी आहे त्यात विजय मिळवायचा अधिकारही फक्त तुलाच आहे. कुणालाही समजावून सांगण्याची गरज नाही,तुझंशांतसंयम हेच उत्तर असेल.तुला जे हवं आहे ते नक्की मिळेल,फक्त वाटचाल अविरत चालूठेव.
#Cp
‘उणिवा‘ या प्रत्येकात असतात आणि ज्याची त्याला जाणीव देखील असते.
काही त्या लपवण्याचा प्रयत्न करतात.
तर काही दुसऱ्यांमध्ये त्या शोधून सहानुभूती मिळवून पोकळ दिलासा देत राहतात.
काही त्याचा स्वीकार करून त्यात सुधारणा करतात..
#Pranjal_
प्रांजल
आज व्हॉट्सऍप स्टेटस बघून एकदम मस्त वाटतंय..सगळी लाडकी छोटी पिल्लं आज कृष्ण झालेत…अगदी गोजिरवाण रुप घेऊन सगळ्यांचे मस्त गोड फोटो /व्हिडीओ केलेत खूपच गोंडस दिसत आहेत सगळे गोविंदा…❣️😍…
आज फास्टफूडच्या राजाचा दिवस म्हणजेच जागतिक वडापाव दिवस.
जगभरात छोटंसं दुकान ते पंचतारांकित हॉटेल पर्यंत सर्वांना दखल घ्यायला लावणारा वडापाव कोणाला आवडत नसेल अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळच !
वडापावला वेळ नसते, पण वेळेला वडापाव असला की खाण्याची चिंता नसते.
शेतकरी आपल्या पशुधनाला पोटच्या मुलबाळांएवढच प्रेम करतो…हे आज पुन्हा अनुभवल…आज्जीचा फोन आलेला शेळीला बिबट्याने गळ्याला पकडलं आरडाओरडा करुन तो पळाला पण नख नेमक गळ्याला लागलंय ती काही खातपीत नाहीये आज्जी खूप रडत होती मुक्या जीवाला वेदना होतातेत त्यात आज्जीचा खूप जीव आहे शेळीवर🙁😔
आनंदाची बातमी भारताने
#Paris2024
ऑलिम्पिकमध्ये आपले चौथे पदक जिंकले आहे.
भारताने हॉकीमध्ये स्पेनचा पराभव करून कांस्यपदक मिळवले. 🥉
भारतीय खेळाडूंचे अभिनंदन ✌️🫡
💐💐💐💐💐💐
पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला
धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला
उठि उठि गोपाला
- बाळ कोल्हटकर| कुमार जी
#GoodMorning
#theme_pic_India_sunrise
एका तिबेटीयन म्हणीबद्दल मित्राने सांगितले होते आज ते पुन्हा वाचनात आले म्हणून ट्विट करतेय त्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे :
उत्तम आणि दीर्घायुष्यी जगण्याचे रहस्य हे आहे:
अर्धे खा, दुप्पट चाला ,तिप्पट हसा आणि अगणित प्रेम करा.
#वाचलेलं
#Cp
आजारपण खूप वाईट..देवाने तुम्हाला भरभरून आरोग्य दिलय याबद्दल त्याचे आभार माना कित्येकांच्या आयुष्यात कोवळ्या वयात सुरू झालेल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या आणि त्यामुळे बिघडत चाललेलं घरातलं वातावरण यामुळे जगण्यातला रस निघून जातो मरणाची वाट पाहत दिवस ढकलन चालू होत
#Pranjal_
प्रांजल
मन सुन्न करणारी घटना आहे 🥲
नराधमाला भर चौकात फाशी द्या !
#बदलापूर मधील झालेल्या अत्याचाराची घटना ही अतिशय धक्कादायक तसेच निंदनीय आहे. सरकारने लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करावी...
आता ज्ञानमंदिरात देखील चिमुकले सुरक्षित नाही ही शरमेची बाब आहे .
सुप्रभात ट्विटरकर😀
आता पुढचे काही दिवस फक्त बाप्पा सोबत राहायच…मोदक खाऊन मस्त फॅमिली सोबत गणेशोत्सव साजरा करायचा…
🤩🤩🤩🤩🤩
भेटू पुन्हा…🙏🙏
टा टा 👋 ट्विटर फ्रेंड्स..
“ राग आणि भावना व्यवस्थापन हे गंभीर विषय आहेत. योग्य प्रकारे हाताळले नाहीत तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. यासाठी संयम आणि स्व-नियंत्रणाची आवश्यकता असते.”
#वाचलेलं 📕
#Reading
📖
#Cp
नेहमी भविष्यात काय काय होऊ शकत याचा विचार करण देखील गरजेच असतं..ज्यावेळी तुम्ही वर्तमानात जे आहे तेवढच पाहता त्यावेळी तुम्ही निराश होता..पण जेव्हा तुम्ही भूतकाळात डोकावता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की त्यावेळेत आणि ह्या वेळेत खरच बदल झाला आहे..त्याचप्रमाणे तुम्ही भविष्यात काय काय